नियोजित प्रकल्प मार्गी लावणार : फालेरो

नावेलीत २० जणांना ‘लाडली लक्ष्मी’चे धनादेश

13th January 2019, 06:09 Hrsप्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : नावेली मतदारसंघात सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेचा बहुसंख्य महिलांना लाभ झालेला आहे. या योजनेंतर्गत समाज कल्याण खात्याने लाडली लक्ष्मीचे बरेच अर्ज मंजूर केलेले आहेत. टप्प्या-टप्प्याने त्यांचे धनादेश वितरीत केले जाणार आहेत. तसेच नावेलीतील सर्व नियोजित प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे आमदार लुईझिन फालेरो यांनी शनिवारी येथे सांगितले.
नावेली येथील आरोग्य केंद्राच्या आवारात समाज कल्याण खात्यातर्फे लाडली लक्ष्मी योजनेच्या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फालेरो बोलत होते. या कार्यक्रमात नावेली मतदारसंघातील २० महिलांना लाडली लक्ष्मी योजनेचे धनादेश वितरीत करण्यात आले.
नावेली मतदारसंघात सरकारच्या सहकार्याने आरोग्य सेवा सुधारण्यात आलेली आहे. या छोट्या आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर्स व परिचारीका नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्राचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. वीज व पाणी पुरवठाही सुरळीत करण्यावर भर देण्यात आलेली आहे. लोकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
नावेली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण बरेच प्रकल्प सरकार दरबारी सादर केलेले आहेत. ते प्रकल्प मार्गी लागण्यासाठी थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे. पुढील चार वर्षांच्या कार्यकाळात आपण नावेलीतील सर्व नियोजित प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे आमदार लुईझिन फालेरो यांनी सांगितले.        

Related news

लिफ्ट देणे कार चालकाच्या बेतले जीवावर

सिरसईच्या जीवन च्यारींचा जांबोटीत मृतदेह; खून करून पळवली कार Read more

साडेनऊ महिन्यांनंतर मडकईकर विधानसभेत

शरीराची डावी बाजू कमजोर, पण उत्साह पूर्वीसारखाच Read more

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more