झेवियर डिसोझाला कांस्य पदक

10th January 2019, 04:18 Hrs

पणजी :‘खेलो इंडिया’च्या दुसऱ्या सत्रात गोव्याने पहिल्या पदकाची कमाई केली. या स्पर्धेचे आयोजन बालेवाडी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स पुणे येथे करण्यात आले आहे. गोव्याच्या झेवियर डिसोझाने २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये मुलांच्या २१ वर्षांखालील गटात १.५७.६२ चा वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले.
मुलींच्या २१ वर्षांखालील गटात सुमन पाटीलने २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये २.२५.३७ सेकंदाचा वेळ नोंदवत चौथे स्थान मिळवले तर ५० मीटर्स बटरफ्लाई प्रकारात तिने ०.३१.६९ सेकंदाचा वेळ नोंदवला.
इतर निकाल याप्रमाणे : साची ग्रामसुपाध्याय : २०० मीटर फ्री स्टाईल, वेळ २.२६.१९ सेकंद, स्थान ५ वे. ८०० मीटर फ्री स्टाईल वेळ ११.१५.६९ सेकंद स्थान ७वे. किरण नार्वेकर : ८०० मीटर फ्री स्टाईल, वेळ : ११.१९.८७ मीटर, स्थान ८वे.

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more