दोन टी-२० तर ५ एकदिवसीय सामने खेळणार

10th January 2019, 04:16 Hrs

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा जाहीर
मुंबई :ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्या कालावधीत श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका आटोपून ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. येथे ऑस्ट्रेलिया ३ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे.
गुरुवारी दोन्ही देशांच्या बोर्डाने या कार्यक्रमाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा हा भारत दौरा २४ फेब्रुवारी रोजी टी-२० सामन्यांच्या मालिकेपासून सुरू होईल. ही टी-२० मालिका १३ मार्च रोजी संपणार. मालिकेतील दोन्ही टी-२० सामने संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवण्यात येतील तर एकदिवसीय सामने दुपारी १ वाजल्यापासून सुरू होतील.
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ मार्च रोजी हैदराबादमध्ये होईल तर ५वा व अंतिम एकदिवीय सामना दिल्लीत खेळवण्यात येईल. इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. याच्या दोन महिन्यानंतर भारतीय खेळाडू जवळपास दोन महिने चालणाऱ्या आयपीएल टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहेत व यानंतर विश्वचषकासाठी इंग्लंडला प्रयाण करतील.
टी-२० सामन्याचे वेळापत्रक
दिनांक सामना स्थळ वेळ
२४ फेब्रुवारी पहिला टी-२० बंगळुरू संध्या. ७ वा. पासून
२७ फेब्रुवारी दुसरा टी-२० विशाखापट्टणम संध्या ७ वा. पासून
एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक
दिनांक सामना स्थळ वेळ
२ मार्च पहिला एकदिवसीय हैदराबाद दु. १ वा.
५ मार्च दुसरा एकदिवसीय नागपूर दु. १ वा.
८ मार्च तिसरा एकदिवसीय रांची दु. १ वा.
१० मार्च चौथा एकदिवसीय मोहाली दु. १ वा.
१३ मार्च पाचवा एकदिवसीय दिल्ली दु. १ वा.

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more