पांड्या, राहुलवर दोन सामन्यांच्या निलंबनाची तलवार!

10th January 2019, 04:16 Hrs

मुंबई :एक टीव्ही कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या व सलामीवीर केएल राहुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही खेळाडूंवर प्रत्येकी दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
प्रशासक समितीचे दुसरे सदस्य डायना एडुल्जी यांनी हे प्रकरण बीसीसीआयच्या कायदेशीर समितीकडे पाठवले आहे. पांड्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर त्याने ट्वीटरवरून माफीही मागितली होती. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना ‘कारणे दाखवा’ नोटीसही जारी करत २४ तासांची मुदत दिली होती.
दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्तरात बोर्ड व प्रशासनिक समितीकडे माफी मागितली होती. पांड्या व राहुलच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना विनोद राय यांनी सांगितले, हार्दिकने दिलेल्या स्पष्टीकरणाशी मी सहमत नाही व दोन्ही खेळडूंवर दोन सामन्यांचे निलंबन लादण्याची शिफारस मी केली आहे.
डायना एडुल्जी यांनी याप्रकरणावर संमती दिल्यास यावर निर्णय घेण्यात येईल. टीम इंडिया शनिवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही खेळाडू या मालिकेसाठी टीम इंडियासोबत आहेत.

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more