फोंड्यात सख्खया भावावर गोळीबार

16th December 2018, 02:02 Hrs


प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : शांतीनगर-फोंडा येथे जमिनीच्या वादावरून एका व्यक्तीने आपल्या लहान भावावर गोळीबार करण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. गोळी लागलेला पीडित बांबोळी येथे गोवा मेडिकल महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ही घटना घडली. शांतीनगर-फोंडा येथील संशयित व्यक्ती गोकुळदास डांगी (५४) एका कामगाराच्या सहाय्याने घराच्या जवळ असलेल्या माडावरील नारळ काढत होता. त्यावेळी त्याचा लहान भाऊ शरद डांगी (४२) यांनी नारळ काढणाऱ्याला जाब विचारला. त्यावेळी दोघा भावांमध्ये वाद झाला आणि या भांडणात मोठ्या भावाने धाकट्या भावावर पिस्तूलाने गोळी झाडली.
संशयित व्यक्ती जुन्या घराजवळ राहतो. तर पीडित शरद आणि त्याचा दुसरा भाऊ रघुवीर डांगी जुन्या घरात राहतात. संशयिताकडे पॉईंट २२ पिस्तूल आहे. या पिस्तुलाने त्याने लहान भावावर गोळी झाडली. ही गोळी शरद यांच्या हृदयाखाली लागली व ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित बांबोळी येथे उपचारासाठी नेण्यात आले. तसेच संशयितसुद्धा या भांडणात जखमी झाल्याने त्याच्यावर फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद यांच्या शरीरातून गोळी काढण्यात आली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताने वापरलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.      

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more