वास्कोत दुचाकीचोर गजाआड

स्कूटर जप्त, वास्को पोलिसांची कारवाई


23rd August 2017, 09:07 pm
वास्कोत दुचाकीचोर गजाआडबायणा वास्को येथून १५ ऑगस्टच्या रात्री चोरीस गेलेली स्कूटर जप्त करण्यात वास्को पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नागराज यमनप्पा पुडजली (१८, शांतिनगर, वास्को) याला अटक केली आहे. बायणा वास्को येथील नझिमाबी शेख या महिलेने आपली एक्टिव्हा फोर जी स्कूटर क्र. जीए ०६ आर ३५६४ चोरीस गेल्याची तक्रार पोलिस स्थानकात नोंदवली होती. पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.