टपाल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पाच दिवसांचा आठवडा, कर्मचारी भरती व इतर मागण्या प्रलंबित


23rd August 2017, 07:12 pm
टपाल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलनभारतीय टपाल कर्मचारी संघाने बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात गोव्याच्या विविध शहरातील टपाल कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने लोकांना सेवा देण्यात अडचणी येत आहेत. एखादा कर्मचारी आजारी पडल्यावर कामाचा ताण वाढत असताना, सरकारकडून नव्या योजना राबवल्या जात आहेत. लोकांपर्यंत या योजना पोचवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. पाच दिवसांचा आठवडा करणे, कर्मचारी भरती तसेच अन्य मागण्या २००५ सालापासून प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.