खाणपीठातील पाणी शेतीला सोडण्याचे आदेश

सभापतींनी घेतली अधिकाऱ्यांची तातडीची बैठक


07th December 2018, 06:15 pm



प्रतिनिधी | गोवन वार्ता
डिचोली : साखळी मतदारसंघातील विविध पंचायत विभागांत शेतीला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. खाणपीठातील पाणी पम्पिंग करून तातडीने सिंचनासाठी उपयोगात आणावे, असे आदेश सभापती तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
खाणपीठातील पाणी शेतीसाठी पुरवणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी शेतीला पाणी मिळत नसल्याने गंभीर समस्या निर्माण होत आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
अॅडव्होकेट जनरल, मुख्य अभियंता, जलसंसाधन खाते, संदीप नाडकर्णी, प्रमोद बदामी, खाण खात्याचे सचिव, लेविंसन मार्टिन्स, स्थानिक पंच, के. पी. नाईक तसेच जलसिंचन, खाण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत शेतीला पाणी नसल्याने शेती धोक्यात आलेली अाहे. तातडीने पाणी सुरू झाले नाही, तर शेतीला नुकसान होण्याची भीती आहे. तातडीने कार्यवाही करा, अशी सूचना सभापतींनी केली.
यावेळी चर्चा केल्यानंतर जलसंसाधन खात्यातर्फे तातडीने आदेश जारी करण्याचे ठरले. लवकरच शेतीला पाणी मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात
आली.