पशु चिकित्सा केंद्राचे १२ रोजी उद्घाटन

साळमधील दूध उत्पादकांनी घेतली मंत्री माॅविन गुदिन्हो यांची भेट

07th December 2018, 05:15 Hrsप्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : साळ गावातील दूध उत्पादक शेतकरी व संस्थांनी पशुसंवर्धन मंत्री माॅविन गुदिन्हो यांची भेट घेऊन गावातील विविध समस्या मांडल्या. यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी साळमधील शेतकरी वर्गाला दूध उत्पादन व इतर बाबतीत पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली. तसेच साळ गावात पशु चिकित्सा केंद्राचे १२ रोजी उद्घाटन होणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सरपंच व पंच घनश्याम राऊत, साळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण गावस, खोलपे दूध संघाचे अध्यक्ष रोहदास सावंत, नागेश पंडित, गंगाराम पाटील, रमेश परब, सुरेंद्र राऊत, सगुण राऊत, देऊ झोरे तसेच पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश केणी व इतर उपस्थित होते. त्यावेळी शिष्टमंडळाने साळ गावात पशु चिकित्सा केंद्र सुरू करण्याची मागणी केली. मागणी मंत्री गुदिन्हो यांनी मान्य केली असून १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. केंद्राचे उद्घाटन करण्याचे निश्चित केले आहे.
दूध उत्पादनात साळ गावाला चालना देण्यासाठी मंत्री गुदिन्हो यांनी साळ गावाची दुग्ध ग्राम म्हणून निवड केली आहे. अनेक युवकांना या व्यवसायाकडे वळवून स्वावलंबी करण्याचा आपला ध्यास आहे. त्यादृष्टीने काम सुरू असून युवकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.
यावेळी शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली. तसेच साळ गावात पशुचिकित्सा केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याबद्दल मंत्र्यांचे आभार मानले. 

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more