hitbtc sign in yobit.net вход hitbtc exchange

प्लास्टिक कचऱ्याचा करता येईल सदुपयोग

प्लास्टिकचे विघटन ५०० ते ८०० डिग्री सेंटी या तपमानावर होते. त्यातून काही प्रमाणात ज्वलशील वायू निघत असला तरी प्रामुख्याने द्रव पदार्थ वायुरुप स्थितीत तयार होतो. तो थंड करणाऱ्या नळीतून प्रवाहित केला जातो. त्यापासून पेट्रोल सारखा पदार्थ तयार होतो.

Story: विज्ञान विहार | डॉ. प्रमोद पाठक | 07th December 2018, 05:30 Hrs

प्लास्टिकचा कचरा हा जगभरात मोठ्या प्रदूषणाचा मुख्य स्त्रोत ठरला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आता वापर अनिवार्य ठरलेल्या प्लास्टिकच्या बहुविध वस्तूंची वापरानंतर कशी विल्हेवाट लावायची हा भयंकर प्रश्न संपूर्ण मानवजातीपुढे उभा अाहे. प्लास्टिकचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यातल्या त्यात तीन प्रकारचे प्लास्टिक जगात फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. पॉलिव्हिनील क्लेराईड ज्याला आपण पीव्हिसी म्हणतो तो पहिला प्रकार, पॉली प्रॉपिलीन हा दुसरा प्रकार आणि पॉलीव्ह इथिलीन हा तिसरा प्रकार आहे. पॉलिथिलीन या प्रकारात ही हाय इन्सिटी आणि लोडेन्सिटी असे दोन उपप्रकार येतात पॉलिथिलीन प्रकारातील प्लास्टिक प्लास्टिकच्या पिशव्या आणि विविध प्रकारची वेस्टने करण्याच्याकामी उपयोगात येते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर किती मोठ्या प्रमाणावर केला जातो हे सांगण्याची आवश्यकता नाही. प्लास्टिक प्रदूषणाबरोबर इतस्तत: पसरलेला, नाल्यांमध्ये साचून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण करणारा, गाई गुरांनी खाण्यामुळे त्यांचे पोट फुटून मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या या पिशव्या मानवजातीला काही अंशी वरदान तर आता शापदायक ठरत आहेत.
या प्लास्टिकचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांमुळे जरी त्याचे विघटन होत असले तरी त्यासाठी लागणारा कालावधी बराच मोठा असतो. आपण व्यवहारात पाहतोच की खुप दिवस उन्हात पडले राहिलेले प्लास्टिक सहज विरते आणि फाटू लागते ते या विघटनाच्या प्रक्रियेमुळे होते.
या प्लास्टिकच्या कचऱ्यावर जै​विक प्रक्रिया करून त्याचे विघटन करण्याचे प्रयत्न म्हणावे तसे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे या प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी औष्णिक विघटन अथवा जाळणे हे दोन पर्यायच सध्या उपयुक्त ठरताना दिसतात.
अनेक उत्पादन प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन जाळून उत्पादन करावे लागते. ज्वलनाच्या वायूंचे तपमान ११००-१२०० पर्यंत जाऊ शकते तसे उच्च तापमानाचे वायू प्लास्टिक जाळून तयार होतात. सिमेंट उद्योग हा असा उद्योग आहे ज्याच्या भट्टीत प्लास्टिक जाळून उष्णता निर्माण करतात. फार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा सिमेंट उत्पादन उद्योगात वापरला जातो. त्यात प्लास्टिक जळून भस्मसात होते.
औष्णिक विघटन :
प्लास्टिक कचऱ्याला दुसऱ्या प्रकारेही उत्पादक कामासाठी वापरल्या जाण्याची तांत्रिक शक्यता वैज्ञानिकांनी तपासून आणि प्रायोगिक स्तरावर प्रत्यक्ष करून पाहिली. प्लास्टिकमध्ये कार्बन अणू आणि हायड्रोजन यांची लांब जाळी सारखी गुंफण असते. उच्च तपमानावर ही लांबच लांब अणूंची गुंफण तोडून त्यापासून कमी कार्बन संख्या असलेले अणू (Molecules) निर्माण करता येतात. कमी लांबीचे अणू द्रवरुप स्थितीत राहतात. ते द्रव पेट्रोल, डिझेल सारखे इंधन म्हणून वापरता येते. त्याचबरोबर अर्धवट जळालेल्या प्लास्टिकपासून कोळशा सारखा घन पदार्थातही तयार होतो.
नायट्रोजन वातावरणात विघटन प्लास्टिक कचरा विघटनासाठी उच्च तपमान लागते. तो हवेत अथवा ऑक्सिजन सोबत प्रक्रिया होऊन जळाला तर केवळ कार्बन डाय ऑक्साईड तयार होईल. तसे होऊ नये म्हणून तपमान वाढविण्यापूर्वी नायट्रोजन गॅसने तो रिअॅक्टर पूर्ण भरतात आणि नंतर त्याला गरम करणे सुरु करतात. प्लास्टिकचे विघटन ५०० ते ८०० डिग्री सेंटी या तपमानावर होते. त्यातून काही प्रमाणात ज्वलशील वायू निघत असला तरी प्रामुख्याने द्रव पदार्थ वायुरुप स्थितीत तयार होतो. तो थंड करणाऱ्या नळीतून प्रवाहित केला जातो. त्यापासून पेट्रोल सारखा पदार्थ तयार होतो.
पेट्रोलियम खनिजापासून जसे निरनिराळ्या तपमानावर उकळणारे पेट्रोल, केरोसिन डिझेल इत्यादी द्रव पदार्थ तयार होतात तसेच प्लास्टिक विघटनातून चार प्रकारचे ज्वलनशील द्रव पदार्थ तयार होतात ते पेट्रोल केरोसीन व डिझेलच्या समकक्ष असतात. जेव्हा त्यांचे अणुस्तरांवर विश्लेषण करण्यात आले तेव्हा दिसले की या तेलामध्ये ८ कार्बन ते ४४ कार्बन असलेली अणू मालिका होती.
प्लास्टिकचे विघटन तपमानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देते. ५०० ते ८०० तपमानावर हळूहळू तपमान वाढविल्यास ज्वलनशील द्रव्याचे उत्पादन वाढताना दिसते. सुमारे ६०% पासून ते ७०% या प्रमाणात वाढ होताना दिसली. तपमान ५०० ते ६००च्या आसपास ठेवल्यास विघटित झालेले प्लास्टिक अणु परत एकत्र येऊन प्रक्रिया उलटी होते. यासाठी प्लास्टिक विघटनाची प्रक्रिया उच्च तपमानावर ७०० ते ८०० डिग्री सेल्सिअस यावर करणे श्रेयस्कर ठरते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे या तपमानावर कोकसारखा कोळशाच्या फुग्यासारखा पदार्थ कमी प्रमाणात तयार होतो. या प्रक्रियेतून मिळणाऱ्या ज्वलनशील द्रव्याचे उपयोगी ठरणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील औष्णिक क्षमता साध्या पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक असते.
प्लास्टिक विघटनाची प्रक्रिया आणि पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे हे तंत्रज्ञान आता पुरेसे विकसित झाले आहे. त्याचे प्रात्यक्षिक मी काही वर्षांपूर्वी स्वत: पाहिले होते. त्याची क्षमता एकावेळी सुमारे ५० किलोपासून ते दिवसभरात २५०० किलो प्ला​स्टिक हाताळण्याइतकी होती. त्यातून तयार होणारे ज्वलनशील द्रव हे अवजड मशिनरी, उत्खनन, यंत्रे, क्रेन इ.साठी वापर आपल्या पेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. तेथे अशा तऱ्हेचे प्रकल्प उभारले गेले आहेत. भारतातही काही काळाने असे प्रकल्प उभारले जातील. त्यातून प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालता येणे शक्य होईल.                  

Related news

काँग्रेसला बक्षीस, भाजपला सजाप

पराभवाच्या खाईत सापडलेल्या काँग्रेसला डोके वर काढण्याची हिंमत या निवडणुकांनी दिली आणि विजयाच्या उन्मादात शेफारलेल्या भाजपचे डोके ठिकाणावर आणण्याची कामगिरी या निवडणुकांनी बजावली आहे. Read more

ओझे - दप्तराचे, अभ्यासाचे की अपेक्षांचे?

एकूणच, दप्तराच्या ओझ्यात एक प्रश्न नाही, अनेक आहेत. खरे ओझे दप्तरात मावणाऱ्या वस्तूंचे आहे की त्यात न सामावणाऱ्या अभ्यासाचे? मुलांवरचा शारीरिक बोजा हा खरा प्रश्न आहे की, मानसिक ताण आणि भावनिक पोकळीची जाण हा? आणि याच्याही पुढे जाऊन शिक्षण व्यवस्था, शाळांची यंत्रणा, शासन प्रशासन, विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून आपल्या वाढत्या अपेक्षा या आजच्या शिक्षण विचारात न मावणाऱ्या आहेत, आणि त्याही दप्तरात जागा अडवून आहेत. ही जाणीव पालक, नागरिक म्हणून आपल्याला सतावते का? Read more

राम मंदिराचा रेटा

आता सर्वोच्च न्यायालयावर विसंबून न राहता निर्वाणीचा रेटा लावून मंदिरासाठी सरकारवर दबाव आणायचा आणि कायदा करून घ्यायचा असे धोरण संघपरिवारात ठरलेले दिसते. Read more

Top News

सतीश धोंड यांच्याकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र

भाजप संघटना बांधणीवर भर, निवडणूक तयारीचा घेतला आढावा Read more

मांद्रेतून उमेश गावकर यांच्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

शिरोड्यातून अभय प्रभूंना मिळू शकते उमेदवारी Read more

मांडवी पुलाची पर्रीकरांकडून पाहणी

जुवारी पुलाच्या कामालाही भेट; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का, विरोधक चकित Read more

अनागोंदी कारभाराला राज्यपाल सिन्हाच जबाबदार

काँग्रेसने मागितला राज्यपालांचा राजीनामा; राष्ट्रपतींना लिहिणार पत्र Read more