ऑस्ट्रेलियात कीर्तिमान रचण्याची विराटला संधी

03rd December 2018, 03:06 Hrs

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विराट कोहली ८ धावा करून नवा कीर्तिमान रचू शकतो. ऑस्ट्रेलियात १ हजार कसोटी धावा पूर्ण करणारा तो भारताचा चौथा खेळाडू बनू शकतो. याआधी ऑस्ट्रेलियात सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण व राहुल द्रविड यांनी १ हजार धावांचा टप्पा गाठलेला आहे.
ऑस्ट्रेलियात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सध्या ८ सामन्यांच्या १६ डावांमध्ये ९९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतक व दोन अर्धशतकही लगावले आहे. त्याची सरासरी ६२.०० अशी आहे.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी धावा काढणाऱ्या भारतीयांमध्ये मास्टर ब्लास्टर स​चिन तेंडूलकर पहिल्या क्रमांकावर आहे. तेंडूलकरने २० सामन्यांच्या ३८ डावांमध्ये ५३.२०च्या सरासरीने १८०९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतके व ७ अर्धशतकांची नोंद आहे. सचिनने कसोटी कारकिर्दीतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या २४१ ऑस्ट्रेलियातच रचली होती.

Related news

विदर्भाच्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २४५ धावा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : संजय रघुनाथ, अक्षय वाडकरची अर्धशतके Read more

मुंबईला हरवून नॉर्थइस्ट दुसऱ्या स्थानी

बार्थोलोम्यू ओगबेचेची १२वा गोल नोंदवून गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी Read more