पहिल्या दिवशी न्यूझीलंड ७ बाद २२९ धावा


03rd December 2018, 03:06 pm
पहिल्या दिवशी न्यूझीलंड ७ बाद २२९ धावा

अबुधाबी :पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी विक्रमाच्या दिशेने कुच केली आहे. साेमवारी त्याने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद करत कसोटीत जलद २०० गडी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ बाद २२९ धावा केल्या आहेत.
या लेग स्पिनरने सलामीवीर जीत रावलला (४५) पाय​चित केले व पुढच्याच चेंडूवर चेंडूवर रॉस टेलरला खातेही उघडू दिले नाही. त्याने हेन्री निकोल्सलाही (१) त्रिफळाचित केले.
न्यूझीलंडने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत चार बाद ७४ धावा केल्या होत्या. उपाहारावेळी कर्णधार केन विलियम्सन २१ धावा करून नाबाद होता तर यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग अजून खाते उघडण्याच्या प्रतीक्षेत होता.
यासिरच्या नावावर ३३ कसोटी सामन्यांमध्ये १९८ बळींची नोंद असून तो ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू चार्ली ​ग्रिमेटच्या ३६ कसोटीत २०० बळीचे विक्रम तोडण्यापासून दोन पावलांवर आहे. ग्रिमेटने हा विक्रम १९३६ साली रचला होता.