फ्रान्सला बरोबरीत रोखण्यात स्पेन यशस्वी

03rd December 2018, 03:05 Hrs

भुवनेश्वर :स्पेन व फ्रान्स यांच्यामध्ये कलिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेला ओडिशा हॉकी विश्वचषकातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. ‘ए’ गटात खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्पेनच्या अल्वारो इगलेसियास व फ्रान्सच्या टिमोथी क्लिमेंटने गोल केले.
विजयाच्या इराद्याने आगेकूच करणाऱ्या फ्रान्सच्या संघाला चांगली सुरुवात करून देत टिमोथी क्लिमेंटने सहाव्या मिनिटालाच गोल करत आपल्या संघाचे खाते उघडले. यानंतर जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावरील फ्रान्सने पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीपर्यंत आपली आघाडी कायम राखली.
आपल्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून पराभूत होणारा जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानावरील संघ स्पेन बरोबरी करण्यासाठी संघर्ष करत होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला बरोबरी करण्याची शानदार संधी मिळाली होती मात्र फ्रान्सच्या गोलरक्षकाने शानदार प्रदर्शन करत त्यांना बरोबरी करू दिली नाही. पहिल्या हाफमध्ये फ्रान्सने स्पेनवर आघाडी कायम राखली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला गोल करता आला नाही. त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली मात्र ते याचा फायदा करून घेऊ शकले नाहीत.
चौथ्या क्वार्टरमध्ये स्पेनला नशिबाची साथ मिळाली व अखेर त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश आले. अल्वारो इगलेसियासने ४८व्या मि​निटाला गाेल करत स्पेनचे खाते उघडले व फ्रान्सविरुद्ध बरोबरी साधली. फ्रान्सला या दरम्यान पेनल्टी कॉर्नर मिळाला होता मात्र स्पेनच्या गोलरक्षकाने शानदार प्रदर्शन करत त्यांना आघाडी मिळवू दिली नाही व अखेर सामना १-१ असा बरोबरीत संपला.

Related news

विदर्भाच्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २४५ धावा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : संजय रघुनाथ, अक्षय वाडकरची अर्धशतके Read more

मुंबईला हरवून नॉर्थइस्ट दुसऱ्या स्थानी

बार्थोलोम्यू ओगबेचेची १२वा गोल नोंदवून गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी Read more