गणरायाच्या स्वागतासाठी तयारी

काणकोण बाजारात दुकाने सजली


23rd August 2017, 03:56 am

प्रतिनिधी
गोवन वार्ता
काणकोण : गणरायाचे अागमन तीन दिवासंवर येऊन ठेपले अाहे. काणकोण तालुक्यातील गणेशभक्तांकडून गणरायाच्या स्वागतासाठी सध्या जय्यत तयारी सुरू अाहे. महागाईचा फटका अाणि ‘जीएसटी' चा वार झेलूनही काणकोणातील गणेशभक्त अापल्या लाडक्या देवतेच्या स्वागतासाठी सज्ज झाले अाहेत. काणकोण बाजारात उत्सवी वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.
कालचा दर अाज नाही. उद्याचा दर परवा नाही. अशी काणकोण बाजारातील सामानाच्या दराची स्थिती अाहे. कडधान्याच्या दरात वाढता भस्मासूर त्यातच दरवर्षी वाढत जाणारे गणपतीच्या मूर्तीचे दर यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला या महागाईतून दिलासा मिळण्यासाठी कोणतीही स्थिती नसली तरी गणरायाचे स्वागत करण्यासाठी मात्र सर्व गणेशभक्त अापल्यापरीने प्रयत्न करीत अाहेत. घरांची साफसफाई, परिसराची स्वच्छता अाणि विजेच्या उपकरणांच्या जोडणीचे काम सध्या सुरू अाहे.
गणपतीच्या अारास सुशोभिकरणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी काणकोण बाजारात माेठी गर्दी दिसत अाहे. काणकोण तालुक्यातील बहुतेक घरात स्वत:हून मखर सजविण्याचे काम सुरू अाहे.
कडधान्य खरेदी करण्यासाठी महिला वर्गाकडून लगबग सुरू असून कडधान्य तसेच किरकोळ सामानाच्या खरेदीसाठी गोवा बागायतदार संघाच्या काणकोण शाखेत गर्दी उसळली अाहे. फळांना अाणि भाज्यांना मागणी वाढणार अाहे. काणकोण बाजारात गावठी भाज्या व फळांची अावक वाढली आहे.
एकूणच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर काणकोणात उत्सवी वातावरण बनले आहे. पुढील दोन दिवसांत बाजारातील खरेदीसाठीची गर्दी वाढणार अाहे. गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा अाणि अानंदाचा सण अाहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वच सामानाच्या दरात वाढ झाली अाहे. तरीही गणेशभक्त खरेदी करताना कोणतीच तडजोड करीत नसल्याचे रामदास फळदेसाई यांनी
सांगितले.