चोरी प्रकरणी एकाला अटक


23rd August 2017, 11:16 pm
म्हापसा : काँक्रिट आजाक्स मशिनची बॅटरी चोरी करणाऱ्या कृष्णा भिमसेन लमाणी (२५, हुबळी) याला म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे.
हा चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास घडला. येथील आझिलो इस्पितळाचे काम करणाऱ्या आयुब सी टी या कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनी इस्पितळ इमारतीच्या परिसरात काँक्रिट आजाक्स हे मशीन ठेवले होते. या मशिनची सुमारे १५ हजारांची बॅटरी काढून पळ काढणाऱ्या संशयिताला कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनी रहिवाशांच्या मदतीने पकडले. त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.