कोकणी साहित्य संमेलनासाठी विविध समित्यांची निवड


16th November 2018, 06:38 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : दि. २ आणि ३ फेब्रुवारी २०१९ रोजी राजबाग-तारीर येथील हाॅटेल मोलेमा या ठिकाणी होणाऱ्या २४ व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाच्या विविध समित्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष कमलाकर म्हाळशी असून प्रशांत नाईक, वैजयंती प्रभुगावकर, डाॅ. पूर्णानंद च्यारी, उल्हास पै भाटीकर, अजित पैंगीणकर, अनंत अग्नी, बासल कार्व्हालो, संजय कोमरपंत, सोकोर फर्नांडिस, सूरज कोमरपंत उपाध्यक्ष आहेत. कार्याध्यक्षपदी ग‍ौरिश वेर्णेकर, सचिव शिरीष पै, सहसचिव प्रसाद पागी आणि खजिनदार शशिकांत पुनाजी यांची निवड झाली आहे. त्याशिवाय देविदास कदम, सुदेश नाईक, सूरज कोमरपंत, शरेद्र नाईक, अन्वेषा सिंगबाळ, ऋषिकेश कदम, योगिता वेर्णेकर, प्रशांत कामत, पंकज नमशीकर, श्रीनाथ पागी, रमेश कोमरपंत, रघुवीर देसाई हे विविध समित्यांचे निमंत्रक आहेत.