चक्रीवादळ : गोव्याला सतर्कतेचा इशारा


15th November 2018, 06:26 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : समुद्रात ‘गज’ चक्रीवादळ निर्माण झाले असून ते पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि दक्षिण बंगालच्या पश्चिमी दिशेकडे सरकत आहे. त्यामुळे गोव्यात मच्छिमारांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याची सूचना हवामान खात्याने जारी केली आहे.             

बुधवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत हे वादळी अाग्नेय, पश्चिम-मध्य आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात होते. पुढील १२ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे वादळ गुरुवारी संध्याकाळपर्यंत तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडेल. वादळी वाऱ्यांचा वेग ८० ते ९० कि.मी. प्रती तास राहील, असा अंदाज आहे. यामुळे दि. १५ आणि १६ नोव्हेंबरला तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा