रामकुमार रामनाथनची १५६व्या स्थानी झेप


22nd August 2017, 08:36 pm
रामकुमार रामनाथनची १५६व्या स्थानी झेपनवी दिल्ली :भारताचा दिग्गज टेनिस खेळाडू रामकुमार रामनाथन एटीपी क्रमवारीत १५६ व्या स्थानावर पोहचला आहे. सिनसिनाटी ओपनमध्ये शानदार प्रदर्शन केल्यामुळे रामनाथनने २४ स्थानांची झेप घेतली.
सिनसिनाटी ओपनमध्ये रामनाथनने पात्रता फेरीत दोन सामने जिंकून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते. पुरुषांच्या दुहेरीत रोहन बोपन्ना १७व्या स्थानावर कायम आहे, मात्र या लिएंडर पेसला ६४व्या क्रमांकावर घसरावे लागले. त्याच्या नंतर दिविज शरण (६७) आणि पेसचा नवा जोडीदार पुरव राजा (६८) यांचा क्रमांक येतो.
डब्ल्यूटीए दुहेरीतील क्रमवारीत सानया मिर्झाला एका स्थानाचे नुकसान झाले आहे व ती आता आठव्या स्थानावर पोहचली आहे. या वर्षी १२ जून पासून सानिया सातव्या स्थानावर होती मात्र आंद्रिया हल्वाकोवाच्या पुढे जाण्याने तिला एका स्थानाचे नुकसान झाले. सानियाकडे आता ५१८० गुण आहेत.