व्हिक्टोरिया अझारेंकाची यूएस ओपनमधून माघार


22nd August 2017, 08:36 pm
व्हिक्टोरिया अझारेंकाची यूएस ओपनमधून माघारन्यूयॉर्क :दोन वेळची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन व्हिक्टोरिया अझारेंकाने यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. आपल्या पतीसोबत मुलाच्या संगोपनावरून न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे.
बेलारुसची २८ वर्षीय स्टारने डिसेंबरमध्ये मुलाला जन्म दिला होता व जून महिन्यात कोर्टवर पुनरागमन केले होते. आपल्या पतीसोबत मुलाच्या संगोपनावरून निर्माण झालेल्या वादाची माहिती तिने मागच्या आठवड्यात ट्वीटरवरून दिली होती व सांगितले होती की कदाचित ती आपल्या मुलाला न्यूयॉर्कमध्ये आणू शकत नाही.
आझारेंकाने सांगितले, या वर्षी यूएस ओपनमध्ये मी सहभागी होऊ शकत नसल्याचे मला दु:ख आहे. मी सध्या घरगुती वादामध्ये अडकले आहे. तिने मागच्या आठवड्यात ट्वीट केले होते की, विम्बल्डननंतर मुलगा लियोच्या वडिलांपासून ती वेगळी झाली होती. त्यावेळी ती १० जुलै रोजी चौथ्या फेरीत सिमोना हालेपविरुद्ध पराभूत झाली होती.