पिळगाव पंचायतीवर गोवा फॉरवर्डचे वर्चस्व

सरपंच, चार पंचायत सदस्यांचा पक्षात प्रवेश

09th November 2018, 06:38 Hrs

प्रतिनिधी : गोवन वार्ता                              

पणजी : पिळगावचे सरपंच प्रदीप नाईक यांच्यासह लालन गिमोणकर, उर्मिला गावकर, संदीप सालेलकर, शंकर जल्मी या चार पंचायत सदस्यांनी गुरुवारी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, रेणुका डिसिल्वा, मयेतील गोवा फॉरवर्डचे नेते संतोष कुमार सावंत उपस्थित होते.      

पिळगावच्या पंचायत मंडळात सात सदस्य असून पाच सदस्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केल्याने आता ही पंचायत गोवा फॉरवर्डच्या हातात आली आहे. राज्यात सर्व मतदारसंघांत गोवा फॉरवर्डने पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम सुरू केले आहे. पक्षाचे तिन्ही मंत्री पक्ष वाढविण्यासाठी विविध माध्यमांतून कार्यरत आहेत. पुढील दहा ते पंधरा दिवसांत मये मतदारसंघाची गट समिती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कामत यांनी दिली.                              

मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डची ताकद वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही जोमाने कार्य करणार आहोत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष मंत्री विजय सरदेसाई यांचे कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी अाहे. त्यामुळे पिळगावचा विकास करण्यासाठी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला आहे, असे प्रदीप नाईक यावेळी म्हणाले. 

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more