गोव्यातील खाणप्रश्न सोडवण्यासाठी संसदेत येणार विधेयक

मंत्री नीलेश काब्राल यांचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे स्पष्ट

Story: विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता |
08th November 2018, 08:26 am

पणजीः गोव्यातील खाण प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने सरकार सर्व दृष्टीकोनातून विचार करत आहे. केंद्र सरकारने अध्यादेश काढून खाणी सुरू केल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात खाणप्रश्नी विधेयक सादर केले जाणार असल्याचे संकेत वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिले. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. यावेळी गोव्यातील खाणींचा प्रश्न सोडवण्यासाठीचे विधेयक या अधिवेशनात नक्कीच येईल, असा विश्वास काब्राल यांनी व्यक्त केला. यासंबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे. यामुळे हे विधेयक संमत झाल्यानंतर खाणींचा विषय निकाली लागणार, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा