गोवा फॉरवर्डचा विस्तार

Story: अग्रलेख-२ | 08th November 2018, 06:00 Hrs

गोवा फॉरवर्डने आखलेली विस्तार योजना केवळ आठ मतदारसंघांपुरतीच मर्यादित राहील असे समजण्याचे कारण नाही. यापूर्वी मगो पक्ष नेहमीच सत्तेत वाटेकरी राहिला आहे, मात्र पक्ष विस्तारासाठी विशेष प्रयत्न झालेले दिसले नाहीत. याउलट गोवा फॉरवर्डने प्रथमच सत्तेत सहभागी झाल्यावर तीन मंत्र्यांच्या सहकार्याने राज्यातील काही मतदारसंघ हेरून हेतुपूर्वक शिरकाव करण्याचे नियोजन केले आहे. राजकीय पक्षाच्या दृष्टिने पाहाता, वाढीसाठी संघटना नेहमीच उपयुक्त ठरत आली आहे. त्या दिशेने गोवा फॉरवर्डची पावले पडताना दिसतात. यापैकी मये सोडला तर बहुतेक मतदारसंघ हे सध्या बिगरभाजप पक्षांच्या ताब्यात आहेत. सरकारचा घटक असला तरी कोणत्याही पक्षाच्या विस्ताराचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही किंवा मर्यादा आणू शकत नाही, हे अगदी खरे आहे. काँग्रेस आणि भाजपला विरोध करीत गोवा फॉरवर्ड प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे सरसावला तर राष्ट्रीय पक्षांना तो शह देऊ शकतो. गोव्याचे राजकारण यापूर्वी मगो आणि युगो या दोन पक्षांभोवतीच फिरत होते. पुन्हा एकदा प्रादेशिक अस्मिता जागविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दिसते.       

Related news

प्रतीक्षा खाणबंदीवरील तोडग्याची

सर्वसमावेशक प्रयत्नांची कमतरता हेच खाणबंदी चालू राहण्यामागील कारण आहे. वर्षभर जे झाले नाही ते चार-दोन दिवसांत काय होणार अशी साहजिक प्रतिक्रिया उमटत आहे, तरी खाण अवलंबितांना १५ तारखेची प्रतीक्षा आहे. Read more

जग घुमेया थारे जैसा ना कोई

‘जग घुमेया थारे जैसा ना कोई’ या गीतातून निर्व्याज प्रेमाचा साक्षात्कार होतो. पूर्णपणे निरपेक्ष प्रेम. शेवटी आपलं माणूस म्हणून जगणं, गृहस्थ म्हणून जगणं कशासाठी असतं? सगळेच प्रेमाचे भुकेले असतात. Read more

जेव्हा नेत्यांची जीभ घसरते...!

मोदी किंवा चंद्राबाबू यांनी आपली पातळी सोडून बोलू नये अशीच जनतेची अपेक्षा आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती असो किंवा मुख्यमंत्री, जनतेचे ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांनीच जर तारतम्य सोडून बोलायचे ठरविले तर कसे होणार? Read more