ईडीसीच्या अध्यक्षपदी सुभाष शिरोडकर

सिद्धार्थ कुंकळयेकरांचा राजीनामा स्वीकारला, महामंडळाची पुनर्रचना

Story: विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता |
31st October 2018, 02:33 pm
ईडीसीच्या अध्यक्षपदी सुभाष शिरोडकर

पणजीः नव्यानेच भाजपात दाखल झालेले शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांची आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संतोष केंकरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचना बुधवारी अवर सचिव (अर्थ) शशांक ठाकूर यांनी जारी केली. दरम्यान, सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा सरकारने स्वीकारला आहे.

आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. सुभाष शिरोडकर व संतोष केंकरे यांच्यासह अर्थ सचिव किंवा त्यांनी नामांकित केलेली व्यक्ती, संदीप भांडारे, राल्फ डिसोझा, पुरुषोत्तम राया पेडणेकर, शिवप्रसाद मणेरकर, ललिता कोरय्या आफोन्सो (महिला संचालक), निनाद कर्पे, आयडीबीआय बँकेकडून नामांकित अधिकारी व ईडीसीचे कार्यकारी संचालक यांचा या मंडळात समावेश आहे. 

हेही वाचा