वाळपई नवोदयचा संघ उत्तर प्रदेशला रवाना

22nd October 2018, 04:44 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
नगरगाव :उत्तर प्रदेश येथील अलिगड येथे २६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय पातळीवर दोरी उड्या स्पर्धा होणार आहे. यात वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालय सहभागी झाले आहे.
सोमवारी दुपारी कुळे रेल्वे स्थानकाहुन ३६ जणांचा संघ गोवा एक्प्रेसने रवाना झाला. त्यांच्यासोबत शारीरिक शिक्षक प्रविण कुमार, देशमुख, अनिता बी. हे तिघेजण शिक्षक आहेत. विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. प्रभुलन, उपप्राचार्य मारुती भेंडवडेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वाळपई नवोदय शाळेत पंधरा दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते.