श्रीलंकेच्या रंगना हेराथचा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय


22nd October 2018, 04:43 pm
श्रीलंकेच्या रंगना हेराथचा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय

कोलंबो :श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने गॉलमध्ये पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेटने सोमवारी याबाबतची घोषणा केली.
४० वर्षीय हेराथ इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. तो आता त्याच मैदानावर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट करणार जेथे त्याने १९९९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते.
श्रीलंकेच्या बोर्डाने सांगितले, आम्ही हेराथच्या निर्णयाचा सन्मान व समर्थन करतो. रंगना हेराथची निवृत्ती श्रीलंका क्रिकेटसाठी मोठी हानी आहे. हेराथने ९२ कसोटी सामन्यात ४३० गडी बाद केले आहेत व विश्वविक्रम रचणाऱ्या मुरलीधरननंतर (८०० गडी) तो श्रीलंकेचा दुसरा सर्वांत यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. हेराथने आपल्या अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना मार्च २०१५ साली वेलिंगटनमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. इंग्लंड​विरुद्ध पहिला कसोटी सामना ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.