विश्वनाथन आनंदला रॉबर्ट हेसने रोखले

ऑईल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ टुर्नामेंट

22nd October 2018, 04:43 Hrs

नवी दिल्ली : माजी विश्वचॅम्पियन विश्वनाथन आनंदने सोमवारी ऑईल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ टुर्नामेंटच्या दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या रॉबर्ट हेसला बरोबरीत रोखले. आनंदने प्रथम भारताच्या १३ वर्षीय रौनक सधवानीविरुद्ध पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर पुन्हा विजय मिळवला होता.
दुसऱ्या फेरीतही आनंद अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही व हेसने त्याला ७८ चालीनंतर बरोबरीत रोखले. हेस कमीत कमी स्पर्धांमध्ये सहभागी होतो. तो आता एक प्रसिद्ध समालोचक आहे व त्याला यावर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी अमेरिकेच्या महिला संघाचा प्रशिक्षक म्हणूनही निवडण्यात आले आहे.
टुर्नामेंटमध्ये उलटफेर होणे चालू झाला असून याचा फायदा भारतीय खेळाडूंना झाला आहे. दुसऱ्या फेरीनंतर दोन गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर असलेला ग्रँडमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाने आपल्यापेक्षा २०० रेटिंग जास्त असलेल्या इस्रायलच्या तामिर नबातीला पराभूत केले.
ग्रँडमास्टर बनण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हर्षा भारतकोटीने अपल्यापेक्षा सरस क्रमवारीवाली भारताच्याच एसपी सेतूरमनचा पराभव केला तर विदिती गुजरातीने भारतीय खेळाडू देवाशिष दासवर मात केली. हंगरीचा पीटर लेको पहिल्या फेरीत तानिया सचदेवकडून पराभूत झाला होता मात्र दुसऱ्या फेरीत तो युवा ग्रँडमास्टर आर. प्रगनानंदला नमवण्यात असफल ठरला व त्याला गुण विभागून घ्यावे लागले.
दोन फेऱ्यानंतर भारताचे पाच खेळाडू संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत एकूण १९ भारतीय खेळाडू खेळत आहेत. प्रस्नाव्यतिरिक्त विदीत, हर्षा, ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता व वैभव सुरीही संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.      

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more