घटक पक्षांचा योग्य सन्मान कराः ढवळीकर

अमित शहांसोबत भेटीत चर्चा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये योग्य संदेश जाणे आवश्यक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th October 2018, 12:58 pm

पणजीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता तसेच मतदारांमध्ये योग्य संदेश जाणे आवश्यक आहे. यामुळे घटक पक्षांचा योग्य मान राखून त्यांना नेतृत्वाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली. राज्यातील नेतृत्व बदलावर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांनी घटक पक्षाच्या नेत्यांची नवी दिल्लीत भेट घेतली. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्यानंतर शहा यांनी ढवळीकर यांच्याशी वैयक्तिकरित्या चर्चा केली. 

सध्या मुख्यमंत्री बदलण्याऐवजी घटक पक्षातील अनुभवी नेत्यांकडे नेतृत्व देऊन प्रशासन गतिमान करणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी यावेळी मांडली. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली घटक पक्षांना योग्य मान व संधी दिल्यास जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल, ज्याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत होईल, असे मत त्यांनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केले. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडील काही खाती इतर मंत्र्यांना वितरित करून, राज्यातील सुस्त प्रशासनाला गती देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा