दोरी उड्या स्पर्धेत वैभव शेटकर प्रथम


22nd August 2017, 11:02 pm
वार्ताहर
गोवन वार्ता
कुळे : अखिल धारबांदोडा तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोरीवरून उड्या मारणे या स्पर्धेत नवे साकोर्डा येथील साकोर्डा एज्युकेशन संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात मुलगे या गटातून प्रथम तर मोठ्या गटातून मुली गटातून तृतीय बक्षीस प्राप्त केले. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आले होते.
मुलांच्या गटातून वैभव शेटकर हा प्रथम तर मुलींच्या गटातून धनश्री शेटकर ही विद्यार्थिनी तिसरी आली. ही स्पर्धा धारबांदोडा याठिकाणी आयोजित केली होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शारीरिक शिक्षक साईश सिमेपुरुषकर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र प्रभू यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.