एम- ७, गिरीदोण संघाला विजेतेपद


22nd August 2017, 11:01 pm
पणजी : डॉन बॉस्को ओपन फुटसाल स्पर्धेत महिला गटात एम-७ संघाने तर पुरुष गटात गिरीदोण संघाने बाजी मारली. डॉन बॉस्को इनडोअर कोर्ट - पणजी येथे दि. ११ ते ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली
होती.
या स्पर्धेत एकूण ३२ पुरुष संघ तर ९ महिला संघांनी सहभाग घेतला हाेता. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला संघांना सहभाग देण्यात आला होता.
महिलांच्या गटात सायलंट किलरने (मडगाव) एम७ बीचा ३-०ने सहज पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात एम ७ ए ने विपर्सचा ३-२ने पेनल्टी शूटआऊटवर पराभव केला. पूर्ण वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत राहिले होते. अंतिम फेरीत क्लासिक नॉर्थ - साउथ गोवाचा एम७ने ३-०ने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. एम७ साठी अॅन्लिन, स्टेस्सी आणि वेलिनीने गोल केले.
एम७च्या वेलिनी फर्नांडिसला आणि फर्स्ट टायमर्सच्या मिलिंद नाईकला उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट गोलकीपर म्हणून एफसी पणजीच्या नावेदला पुरस्कृत करण्यात आले. यावेळी झिटो गुदिन्हो प्रमुख पाहुणे उपस्थित होते.