माडावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू

वाडीवाडो-तिवरे येथील अजय काशिनाथ गावडे (३२) याचा रविवारी संध्याकाळी माडावरुन पडून मृत्यू झाला.


21st August 2017, 03:29 am

फोंडा : वाडीवाडो-तिवरे येथील अजय काशिनाथ गावडे (३२) याचा रविवारी संध्याकाळी माडावरुन पडून मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुवारवाडा-तिवरे येथे ही घटना घडली. माडावर चडला असताना अचानक तो जमिनीवर पडला.फोंडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता गोमेकॉत पाठवला. घटनेचा अधिक तपास फोंडा पोलिस करीत आहेत.