रशियन महिलेला अटक

पासपोर्ट आणि व्हिसा यांच्याशिवाय राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी मितीना युलीया स्वेतलाव या रशियन नागरिक असलेल्या महिलेला अटक केली आहे.


21st August 2017, 03:29 am

म्हापसा : पासपोर्ट आणि व्हिसा यांच्याशिवाय राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी मितीना युलीया स्वेतलाव या रशियन नागरिक असलेल्या महिलेला अटक केली आहे. म्हाड्डोवाड-कळंगुट येथे ऑस्टिन डिसोझा यांच्या घरात बेकायदेशीररित्या ही रशियन महिला वास्तव्यास असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घराची झडती घेऊन तपासणी केली असता संशयित महिलेकडे पासपोर्ट किंवा व्हिसा तसेच इतर कोणतीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी संशयित महिले विरूद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने त्या महिलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक करीत आहेत.