गांजा बाळगणाऱ्या युवकास अटक

कळंगुट पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईखाली सुंदर सिंग (२३, फरिदाबाद, हरियाणा) याला अटक करून त्याच्याजवळील ७ हजार किंमतीचा ३९ ग्रॅम गांजा ताब्यात केला.


21st August 2017, 03:28 am

म्हापसा : कळंगुट पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईखाली सुंदर सिंग (२३, फरिदाबाद, हरियाणा) याला अटक करून त्याच्याजवळील ७ हजार किंमतीचा ३९ ग्रॅम गांजा ताब्यात केला. शनिवारी मध्यरात्री कळंगुट पोलिसांना गस्तीवेळी बांदोडकर पुतळ्याजवळ संशयित आरोपी संशयादस्परित्या फिरताना आढळून आला. पोलिसांना पाहून त्याने पळ ठोकली. पोलिस पथकाने पाठलाग करून त्याला पकडून त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ ३९ ग्रॅम गांजा सापडला. पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक, प्रियंकटेश शेटये, राजू मांद्रेकर व सिद्धेश गवंडी यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताविरुद्ध पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक केली.