सरकारच्या योजना सर्वसामान्यांसाठी : पर्यटनमंत्री

पेडणेतील तीस लाडली लक्ष्मी लाभार्थीना मंजुरी पत्रांचे वाटप


21st September 2018, 06:23 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
‍पेडणे : भाजपचे सरकार हे जनतेचे आहे. या योजना सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या असून त्या अाजपर्यंत चालू आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारातून लवकर बरे होऊन सरकारात सामील होवू दे, अशी प्रार्थना करून ते जनतेसाठी आणखी योजना कार्यरत करतील त्यासाठी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या मागे अाहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.
पेडणे शासकीय विश्रामधाम येथे मतदारसंघातील एकूण ३० लाडली लक्ष्मी लाभार्थीना मंजुरीपत्रे वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पेडणे नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक मांद्रेकर, वजरी सरपंच संगीता गावकर, तोरसे सरपंच बबन डिसोझा, वारखंड सरपंच प्रदीप कांबळी, विर्नोडा सरपंच भरत गावडे, कोरगाव उपसरपंच रंगनाथ कलशावकर, हसापूर सरपंच संतोष मळीक, पोरस्कडे सरपंच रोश फर्नांडिस आदी उपस्थित होते. पेडणे नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर यांनी बोलताना या योजनेतील मिळालेले पैसे केवळ लग्न कार्यासाठी न वापरता उच्च शिक्षण किंवा एखादा व्यवसाय थाटायचा असेल तर त्याचा वापर करता येईल, अशी महत्त्वाची सूचना केली.
वजरी सरपंच संगीता गावकर यांनी मंत्री आजगावकर यांचे मतदारसंघासाठी विकासाचा ध्यास घेण्याबरोबरच विविध योजनांचाही लाभ जनतेला मिळवून देण्याचे कार्य चालू असून सत्ता असेल तेथे आजगावकर यांनी जावेे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक हसापूर सरपंच संतोष मलिक यांनी केले.

भाजप सरकारने सुरू केलेली लाडली लक्ष्मी ही योजना सर्वसामान्य युवतीला समोर ठेवून कार्यरत केली असून या योजनेचा लाभ घेताना त्याचा विनियोग चांगल्या कामासाठी करा. - बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री 

हेही वाचा