hitbtc sign in yobit.net вход hitbtc exchange

गव्याच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू

कावरे पिर्ला येथील घटना; स्थानिकांत घबराट, गव्याला पकडण्याची मागणी

21st September 2018, 06:11 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता

सावर्डे : काही महिन्यांपूर्वी सत्तरी तालुक्यातील दोन महिलांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच कावरे पिर्ला येथील पंढरी धरमू गावकर (६५) यांचाही गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

गुरांना शोधण्यासाठी बुधवारी रात्री काजू बागायतीत गेलेल्या पंढरी गावकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी जवळच्याच काजू बागायतीत आढळून आला. या घटनेमुळे कावरे पिर्ला परिसरात घबराट पसरली असून, मुक्त संचार करणाऱ्या गव्याला पकडण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंढरी गावकर यांची गुरे बुधवारी जवळच्याच काजू बागायतीत चरण्यासाठी गेली होती. पण ती रात्रीपर्यंत ती घरी न आल्याने पंढरी गावकर रात्री त्यांना शोधण्यासाठी बागायतीत गेले ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण बुधवारी रात्री ते सापडले नाहीत. गुरुवारी सकाळी जवळच्याच बागायतीत स्थानिकांना गावकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहापासून काहीच अंतरावर गवाही असल्याचे दिसून आले. त्या गव्याने गावकर यांना शोधण्यासाठी आलेल्या एका स्थानिकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्या स्थानिकाने झाडावर चढून आपला जीव वाचविला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी, केपेचे निरीक्षक तसेच सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गव्याला पकडण्याचे प्रयत्न केले. पण गवा त्यांच्या हाती लागला नाही. या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले असून, कोणत्याही परिस्थितीत गव्याला पकडा किंवा त्याला ठार मारा, अशी मागणी त्यांनी वन खात्याकडे केली आहे.

दक्षिण गोवा वन खात्याचे उपवनपाल अनिल शेटकर यांच्यासह इतर वनाधिकारी तसेच केपेच्या पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर गावकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथे पाठविण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उपवनपाल शेटकर यांनी, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गावकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या गव्याला जखमी केले असून, त्याला पकडण्याची तयारीही केली असल्याची माहिती दिली.

‘दोन-तीन दिवसांत गव्याला पकडा, अन्यथा...’

सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी, पंढरी गावकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या गव्याला वन खात्याने दोन ते तीन दिवसांत जेरबंद करावे. अन्यथा आपण लोकांसोबत राहून पुढील कारवाई करू, असा इशारा दिला. गव्याला आताच न पकडल्यास तो गावातील इतर नागरिकांवरही हल्ले करू शकतो. येथील लोकांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे याप्रश्नी आपण तत्काळ योग्य पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related news

अनागोंदी कारभाराला राज्यपाल सिन्हाच जबाबदार

काँग्रेसने मागितला राज्यपालांचा राजीनामा; राष्ट्रपतींना लिहिणार पत्र Read more

Top News

सतीश धोंड यांच्याकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र

भाजप संघटना बांधणीवर भर, निवडणूक तयारीचा घेतला आढावा Read more

मांद्रेतून उमेश गावकर यांच्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

शिरोड्यातून अभय प्रभूंना मिळू शकते उमेदवारी Read more

मांडवी पुलाची पर्रीकरांकडून पाहणी

जुवारी पुलाच्या कामालाही भेट; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का, विरोधक चकित Read more

अनागोंदी कारभाराला राज्यपाल सिन्हाच जबाबदार

काँग्रेसने मागितला राज्यपालांचा राजीनामा; राष्ट्रपतींना लिहिणार पत्र Read more