काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीत, भाजपची लोकसभेवर चर्चा, मगोचीही बैठक

नेतृत्वाचा विषय बाजूला


17th September 2018, 06:57 am
काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीत, भाजपची लोकसभेवर चर्चा, मगोचीही बैठक

बम्मू फोंडे

प्रतिनिधी: गोवन वार्ता

पणजी

सत्ता स्थापनेचा दावाकरण्यासाठी काँग्रेसचे आमदार बैठकीनंतर राज्यपालांना भेटणार आहेत.  तर भाजपकडून लोकसभा निवडणूक तयारीसाठीच्यारणनीतीवर चर्चा सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवत मगो पक्षानेहीबैठक बोलावली असतात गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांची काहीच हालचाल दिसत नाही. मात्रया घडामोडीत नेतृत्वाचा विषय बाजूलाच राहिला आहे.

भाजप गाभा समिती आणि केंद्रीयनिरीक्षक यांच्यासोबत पणाजीतील कार्यालयात सुरू असलेल्या माजी आमदारांच्या बैठकीतराज्याची सध्याची राजकिय परिस्थितीचा आढावा व लोकसभेतील रणनिती काय असावीयासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभेत भाजपचे दोन्ही खासदार निवडून आणण्याची क्षमताआहे. मात्र त्यासाठी संघटन वाढविण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार, मंत्र्यांनी मांडले आहे.

या संदर्भात माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना गोवा फॉरवर्ड पक्ष्याचे विलीनीकरणझाल्यास स्वागतच आहे, त्यामुळेपक्ष वाढेल असे स्पष्टपणे सांगितले आहे.जयेश साळगावकर याना भाजपने उमेदवारी दिलीतरी हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले.  माजी आमदार गणेश गावकर यांनी केंद्रीयनिरीक्षकाकडे मांडले मत मांडताना खाणी लवकर सुरू झाल्यास राजकीय तिढा सुटेल असेसांगितले आहे, तर मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर हेचराहावेत अशी मागणी केंद्रीय निरीक्षकाकडे माजी मंत्री महादेव नाईक यांनी केली आहे.

हेही वाचा