काकोडा येथील विद्यार्थिनीची आत्महत्या


19th August 2018, 11:50 pm


सावर्डे :
कुडचडे येथील एका हायस्कूलमध्ये नववीत शिकणारी विद्यार्थिनी आरती कुमारी मोरया (१३, कुडचडे काकोडा) हिने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
हायस्कूलमधील परीक्षेचा शनिवारी निकाल असल्याने ती रात्रीपासून दबावाखाली होती. सकाळी ७.३० वा. उठल्यानंतर तिने आपल्या घरी गळ्याला दुपट्टा बांधून आत्महत्या केली. तिला प्रथम काकोडा आरोग्य केंद्र व नंतर बांबोळी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. रविवारी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनीत कवळेकर करीत आहेत.