हडफडे येथे मसाज पार्लरवर छापा

६ तरुणींची सुटका, तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई


11th August 2018, 05:11 pm
हडफडे येथे मसाज पार्लरवर छापा

हडफडे येथील एका मसाज पार्लरवर छापा टाकून गुन्हे शाखेने सहा तरुणींची सुटका केली. पूर्वोत्तर राज्यातील तरुणींनी बळजबरीने अनैतिक व्यवसायात ढकलल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या व्यवसायातील मुख्य सूत्रधार श्याम भारती फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, मसाज पार्लरच्या नावाखाली या ठिकाणी अनैतिक व्यवहार सुरू असल्याचा सुगावा लागल्यानंतर सवेरा या बिगर सरकारी संघटनेच्या साह्याने गुन्हे शाखेने हा छापा टाकला. यावेळी पूर्वोत्तर राज्यातील सहा तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना बळजबरीने अनैतिक कामे करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती यावेळी समोर आली. पोलिसांनी जॉन्सन संजू मास्कारेन्हस (म्हापसा), मंजुनाथ रामकृष्ण सोनार (कारवार-कर्नाटक) व शशांक चंद्रशेखर वारंग (सावंतवाडी-महाराष्ट्र) यांना अटक करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे, सतीश गावडे व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


हेही वाचा