'अनैतिक' कृतीमुळे टॅक्सी परवाना निलंबित

टॅक्सी मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने राज्य वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय


06th August 2018, 04:26 pm
'अनैतिक' कृतीमुळे टॅक्सी परवाना निलंबित

बागा येथे वेश्याव्यवसायप्रकरणी वापरण्यात आलेल्या टॅक्सीच्या मालकाने वाहतूक प्राधिकरणाच्या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने टॅक्सीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. टॅक्सी मालकाने वाहन घरी उभे करून ठेवावे व आपला परवाना ४८ तासांत जमा करावा, अन्यथा प्राधिकरण ७ दिवसांत कारवाई करणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

याविषयी अधिक माहितीनुसार, ३० मे २०१८ रोजी कळंगुट पोलिसांनी बागा येथे छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला होता. टॅक्सीचालक तथा दलाल मंजूनाथ बलगानूर (२४, कांदोळी) हा जीए ०३ एन ९९४१ क्रमांकाच्या टॅक्सीतून दोघा तरुणींना ग्राहकाकडे सुपूर्द करण्यासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले होते. मानवी तस्करी व वेश्याव्यवसायासाठी वापर झालेल्या सदर गाडीचा मालक श्रीधर मार्कंड राऊत याला यासंबंधी नोटीस पाठवून परवाना का निलंबित करू नये, याचे उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु, त्याने कोणतेच उत्तर न दिल्याने गाडीचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा