सुर्लात १५० जणांच्या कृती समितीची स्थापना

निवडलेली समिती पुढील प्रमाणे


16th July 2018, 07:20 pm

सुर्लात १५० जणांच्या कृती समितीची स्थापना
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई ,नगरगाव :
सुर्ला गावातील जागरूक युवकांनी संघटित होऊन गाव कृती समिती स्थापन केली आहे. त्यात १५० सदस्य असून ६५ महिलांचा त्यात समावेश आहे. ३६ जणांची मुख्य समिती गठित गेली असून गणू भिवा गावकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. गायत्री अर्जुन गावकर महिला समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.यावेळी लोकांनी सुर्ला गावातील बारबंदी विषयावर खास ग्रामसभा घेण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात आज सोमवारी ठाणे पंचायत ग्रामसभा घेण्याबाबत तारीख नि​श्चित करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी १९ जुलैला वाळपई मामलेदार कार्यालयात खास बैठक बोलविण्यात आली आहे. सुर्लातील दारू दुकांनाच्या प्रश्नाव सरकार कोणती भूमिका घेते, हे बघितल्यावरच पुढील कृती आखली जाणार आहे.
महिला अध्यक्ष गायत्री गावकर यावेळी म्हणाल्या, गावात दारुबंदी सुरक्षा, भावी पिढीच्या दृष्टीने तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्याची नितांत गरजेची आहे. लक्ष्मी गावकर व प्राची प्रभाकर गावकर म्हणाल्या, गावातील अनेकांनी दारूपायी आपले आयुष्य बरबाद केले आहे. आम्ही देखील हे अनुभवले आहे.
कोट
आम्ही आता दारुबंदीच्या निर्णयापाजसून अजिबात मागे हटणार नाही. ८ जुलै च्या बैठकीत दारू विक्री दुकान मालकांनी दारू बंदीसाठी मान्यता दिली होती. मात्र त्यांनी आपली भूमिका अचानक बदलली. त्यामुळेच हा विषय पुढे लावून धरणार आहोत.
गणू गावकर, अध्यक्ष,गाव कृती समिती, सुर्ला
------------
निवडलेली समिती पुढील प्रमाणे
अध्यक्ष: गणू भि. गावकर. उपाध्यक्ष : संतोष बा. गावकर. सरचिटणीस : अर्जुन ता. गावकर, सचिन सि. गावकर.
सचिव : सगुण रा. गावकर, संतोष म. गावकर. खजिनदार : दीपक उ. गावकर.
समन्वयक: संतोष ना. गावकर, दीपक रा. गावकर, पांडुरंग फ. गावकर, एकनाथ ना. गावकर, शैलेश सि. गावकर, सुशिल म. गावकर, नवनाथ गो. गावकर, विजय बा. गावकर.
समन्वयक : रुपेश ग. गावकर, गणपत वि. गावकर, चंद्रकांत जा. गावस, भिकाजी बो. गावकर, राजाराम ग. गावकर, देमू भि. गावडे, नारायण ह. गावकर, विष्णू बु. गावस, सुभाष पां. गावकर.
महिला समिती :
अध्यक्ष : गायत्री अ. गावकर, सुभद्रा गो. गावकर, उपाध्यक्ष : सेजल सु. गावकर, सचिव : सोनिया सं. गावकर., खजिनदार : दिव्या दे. गावकर, रिया गावकर, पूनम प्र. गावकर, अरुणा गो. गावकर, लक्ष्मी स. गावकर, उत्कर्षा उ. गावकर, प्राची प्र. गावकर, रेश्मा म. गावकर.