मडगाव स्पोर्ट्स क्लबचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सेंट अँथनी फेस्टिवल चषक फुटबॉल स्पर्धा


15th July 2018, 02:20 am



क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को :मडगाव स्पोर्टस् क्लबने उगे रायझिंग स्पोर्ट्स क्लबचा टायब्रेकरवर ४-३ गोलने पराभूत करीत सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डाने आयोजित केलेल्या सेंट अँथनी फेस्टिवल चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
असोल्डा पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेला शनिवारचा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरवर विजेत्या मडगाव स्पोर्ट्स क्लबच्या सावियो कार्दोज, जॉन कुलासो, एवन आरावजो व क्लान्सिओ पिंटोने यांनी गोल केले तर पराभूत उगे रायझिंग स्पोर्ट्स क्लबच्या अॅलिस्टन डिसोझा, डेस्मंड परेरा व ईटालियो गोम्स यांनी गोल नोंदवले. यात मडगाव स्पोर्ट्स क्लबने उगे रायझिंग स्पोर्टस् क्लबवर ४-३ अशी मात केली.