खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर


14th July 2018, 03:09 pm
खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

फोंडाः गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटनेअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सचिवालयवर मोर्चा नेण्याचा निर्णय लांबणीवरटाकला आहे. खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी संबंधित कायद्यात दुरुस्ती करण्याचा ठरावसंमत केला नाही तर १ किंवा २ ऑगस्ट रोजी विधानसभेवर मोर्चा नेणार, असे फ्रंटनेस्पष्ट केले आहे. गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी शनिवारीपत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली.

बहुतेक आमदारांची भेट घेऊन त्यांनानिवेदन देण्यात आले आहे, तसेच त्यांनीही या कायद्यात दुरुस्ती करण्याचा ठरावघेण्याचे आश्वासन दिले आहे.  आमदारांनीआम्हाला हा ठराव संमत करण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. जर त्यांनी शब्द पाळला नाहीतर आम्ही १ किंवा २ ऑगस्ट रोजी मोर्चा काढू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा