आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर

Story: विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता |
14th July 2018, 12:22 pm

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरयांच्या नेतृत्वाखालील राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने शनिवारी ३८५ कोटी रुपयेगुंतवणूक करणाऱ्या तीन उद्योगांचे प्रस्ताव मंजूर केले. तसेच सर्व उद्योगांना एकाचजागी सर्व परवाने घेऊन देण्यासाठी एक खिडकी यंत्रणाही मंजूर केली. शिवाय दोन मरीनाप्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.

गेले पाच सहा महिने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झाली नव्हती.मुख्यमंत्री अमेरिकेतून परतल्यानंतर शनिवारी मंडळाची २० वीबैठक झाली. सुमारे १२ प्रस्ताव मंडळासमोर होते.
मे.
एस फोर ई कंपनीचा तुये औद्योगिकवसाहतीत २० कोटी रुपये गुंतवणुकीचा एक व त्याच कंपनीचा त्याच वसाहतीत ४५ कोटीरुपये गुंतवणुकीचा आणखी एक प्रकल्प मंजूर केला आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे १२५जणांना रोजगार मिळेल असा कंपनीचा दावा आहे.
मे.
युनिकेम लॅबोररीज हा लाटंबार्सेऔद्योगिक वसाहतीत ३२० कोटी रुपये गुंतवणुकीचा उद्योग येत आहे. तिथे ४१५ जणांनारोजगार मिळेल असे कंपनीच्या प्रस्तावात म्हटले आहे.
मे महिन्यात एका आदेशाद्वारे आयपीबी कायद्यातील कलम ८ मधीलतरतुदीनुसार मंडळाला सर्व प्रकारचे परवाने घेण्यासाठी अधिकार दिले होते. त्यासंदर्भात मंडळाने एक यंत्रणा तयार केली आहे. एक खिडकी योजनेत यापुढे कंपन्यांच्यावतीनेमंडळच वेगवेगळ्या अधिकारीणींशी संपर्क साधेल. तिथून परवाने मिळाल्यानंतर मंडळप्रकल्पधारकांना कळ
णार आहे.
दरम्यान
, आजच्या बैठकीत दोन मरीनांचाफेरआढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळाकडून मरीनाचे प्रस्तावपुन्हा अभ्यासासाठी घेतले जातील.

हेही वाचा