संशयास्पद लिंक व फेक न्यूज

Story: माध्यम मानस |
14th July 2018, 06:11 am

 
सध्या सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होणारे मेसेज मोठाचिंतेचा विषय ठरत असून मोठा धोका व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजमुळे निर्माणझाला आहे. व्हॉटसअ‍ॅपने आता अशा फेक न्यूजला लगाम लावण्यासाठी एक नवीन फीचर आणलेआहे. युजरला या फीचरच्या मदतीने संशयास्पद लिंकबाबत पडताळणी करता येणार आहे.
अनेकांना आपले जीव व्हॉट्सअॅपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळेगमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्याआहेत. त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावले आहे. काहीउपाययोजना अशा फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहेत का? असा सवाल केंद्र सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप,यूट्युब, ट्विटर या कंपन्यांना विचारलाआहे.
भविष्यातील धोका ओळखून व्हॉट्सअॅपवर अशा फेक न्यूजना नियंत्रणात आणण्यासाठीएक टूल येणार आहे. फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी सस्पिशिअसलिंक डिटेक्शननावाचे फिचर व्हॉट्सअॅप देणार असल्याचीमाहिती wabetainfo या वेबसाईटने दिली आहे. या नव्याफीचरच्या मदतीनं युजरला व्हॉट्सअॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची चाचपणी करणेशक्य होणार आहे.
युजरला सस्पिशिअस लिंक डिटेक्शनफीचरच्या माध्यमातून एखादी लिंक आल्यास ती फेक आहे का? लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? याचीखातरजमा व्हॉट्सअपकडून केली जाणार आहे. लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असल्यासलिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येणार आहे. हा धोका दुर्लक्ष करत युजरनेही लिंक ओपन केल्यास पुढील सर्व जबाबदारी युजरची असणार आहे. लिंक सुरक्षित असल्यासत्यावर लाल रंग येणार नाही. या नव्या अत्यंत उपयुक्त फीचरची चाचणी सध्या सुरू आहे.हे फीचर येत्या काही दिवसांमध्ये युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
देशभरात खोट्या मेसेजेसमुळे हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर व्हॉट्सअॅपच्याइन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीला केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला होता.व्हॉट्सअॅपने त्यानंतर याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. कारण व्हॉट्सअॅपनेसरकारच्या इशाऱ्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी देशातील मुख्य वर्तमानपत्रांमध्येजाहिरात देऊन नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.