आयटी धोरणामुळे युवकांना रोजगाराच्या संधी : मुख्यमंत्री

Story: विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता |
12th July 2018, 04:46 pm
आयटी धोरणामुळे युवकांना रोजगाराच्या संधी : मुख्यमंत्री

पणजी: गोव्याच्या आयटी धोरणामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, डिजिटल क्षेत्रात गोवा हे देशातील पहिले सामर्थ्यवान राज्य बनेल असा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. 

बुधवारी मंत्रिमंडळाने माहिती धोरण मंजूर केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी आयटी धोरणाविषयी एक व्हिडीओ संदेश जारी केलायात गोवा आयटी क्षेत्रात देशातील पहिले सामर्थ्यवान राज्य बनेल असा दावा  त्यांनी केला. या धोरणामुळे राज्यात १० हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असे, माहिती तंत्रज्ञान मत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाला साथ देत गोव्याने आयटी धोरण जाहीर करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केला आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 
-गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्यातील युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. १४ व १५ जुलै असे दोन दिवस पणजीत आयनॉक्स थिएटरमध्ये आयोजित आयटी दिवस कार्यक्रमात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याहस्ते राज्याचे माहिती तंत्रज्ञान धोरण प्रसिद्ध होईल. 
या धोरणात नव्या उद्योजकांना व गोव्यातील युवकांना नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. आयटी क्षेत्रात उद्योग सुरू करु पाहणाऱ्यांना आयटी धोरणात अनेक तरतुदी आहेत तसेच अनेक सुविधाही राज्य सरकार देणार आहे. 

हेही वाचा