लोकप्रतिनिधींचा आजार

Story: अग्रलेख-२ | 12th July 2018, 06:00 Hrs


मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गंभीर आजारावर मात करीत गोव्यातपरतल्यावर आपले नियमित कामकाज सुरू केले असतानाच, अन्यमंत्री तथा लोकप्रतिनिधी आजारी पडत राहिल्याने प्रशासनाची गती मंदावली आहे. वीज खात्याचेमंत्री पांडुरंग मडकईकर मुंबईहून अद्याप राज्यात परतलेले नाहीत, तोच सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर उपचारासाठी मुंबईतइस्पितळात दाखल झाले आहेत. ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यावरही उपचारसुरू होते. मध्यंतरी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा वैद्यकीय देखरेखीखाली होते. आमदारनिलेश काब्रालही उपचारासाठी राज्याबाहेर गेले आहेत. लोकप्रतिनिधींच्या आजाराचीचर्चा होणे साहजिक आहे. ती कोणी थांबवू शकत नाही, कारणत्याचा सार्वजनिक जीवनाशी संबंध असतो. त्यांचे आरोग्य, त्यांचीकार्यक्षमता राज्याच्या विकासाची गती ठरवते, दिशा ठरवते. विधानसभेचेआगामी अधिवेशन जवळ येऊन ठेपले असतानाच लोकप्रतिनिधी आजारी पडल्याने काही प्रमाणातअनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कितीखात्यांचा भार सोसावा, अशीही चर्चा सुरू झाली आहे.विद्यमान नेते पूर्ववत ठीक होऊन राज्याची घडी लवकर बसावी, त्यांनी उत्साहाने प्रशासकीय काम सांभाळावे अशीच जनतेची अपेक्षा आहे.

Related news

सुर्लावासीयांचा आदर्श इतरांनी घ्यावा!

रान मोकळे मिळालेल्या या पर्यटकांकडून दारूच्या नशेत संपूर्ण गाव वेठीस धरून जी दहशत निर्माण केली जाते. त्यामुळे गावातील शांतता बिघडली आहे. अबकारी खात्याकडून या ठिकाणी दारू विक्रीच्या दुकानांना कायदेशीर परवाने दिले आहेत. परंतु या परवान्यांचे सामाजिक परिणाम काय असू शकतात याचे अबकारी खात्याला काहीच देणे-घेणे नाही. Read more

रंग बदलणारे मासे आणि राजकारणीही !

मासे, फळे, भाज्या यांच्यावर वापरलेल्या फॉर्मेलीनचे प्रमाण कोणी व कसे ठरवायचे? ते अधिकार खरे तर केवळ याच प्रशासनाला द्यायला हवेत. Read more