मृत्यूला हुलकावणी !

प्रत्यक्षात लष्करी पथकाकडे ही जबाबदारी होती. या पथकाने अतीव मेहनतीने आपल्या कौशल्याच्या बळावर त्या मुलांची सुटका केली. त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता आणि शिस्त वाखाणण्यासारखी होती.

Story: अग्रलेख | 12th July 2018, 06:00 Hrs

गेला पंधरवडाभर जगाचे लक्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांच्या भडक निवेदनांकडे लागले नव्हते, ना कोणी रशियातील राजकारणाबद्दलकिंवा पाकिस्तानातील आगामी निवडणुकीवर बोलत होते! गेला पंधरवडा जगाचा एकच केंद्रबिंदूठरला होता आणि तो म्हणजे थायलंडमध्ये जेथे युवा फुटबॉलपटू अडकलेले होते ती महाकायगुहा! गेल्या २६ जूनला मुसळधार पाऊस पडत राहिल्याने खेळ थांबवून खेळाडू सहजपणे ती गुहापाहाण्यासाठी आपल्या प्रशिक्षकासोबत आत शिरले. ते आत शिरल्यावर काही वेळातचमुसळधार पावसाच्या माऱ्याने फुगलेली माती, दगड आतीलभागांत कोसळले ! जणू ते सारे गुहेत नव्हे तर मृत्यूच्या दाढेतच शिरले होते. एकाथरारक आणि विलक्षण धाडसाचे परिवर्तन क्षणात एका मोठ्या संकटात झाले होते. त्यासर्व युवा खेळाडूंसमोर साक्षात मुत्यू उभा ठाकला होता. सर्वच जण १२ ते १६ वर्षेवयोगटातील. केवळ त्यांचे प्रशिक्षक तेवढे वयस्कर. प्रशिक्षकांनी दाखवलेले धैर्यआणि संयम हे तर प्रशंसनीय आहेच, पण त्याही पेक्षा त्यांनीआपल्या सर्व शिष्यगणांचा विश्वास टिकवला हे अधिक महत्त्वाचे. त्या संकटकाळी तीमुले खचून गेली असतील, पण त्यांना धीर देत पंधरा दिवसत्या अंधाऱ्या जलमय गुहेत त्यांच्यामधील निराशा पळवून लावणे ही बाब निश्चितच सोपीनव्हती. यावर मात करीत कोच एकोपोल चानथ्वांग यांनी दाखविलेले धैर्य विलक्षण आहे.
ही घटना जगासाठी धक्कादायक होती. प्रशिक्षक व मुले मिळून १३जणांच्या जीवावर बेतले होते. त्यांच्या सुटकेसाठी जगभरातील सुमारे शंभर जण प्रयत्नकरीत होते. सर्वच लोकांची सहानुभूती त्यांच्या मागे होती. जात-पात, देश-वंश विसरून केवळ मानवता हाच धर्म मानून सारेच जण या मुलांच्यासुटकेसाठी आपल्या परीने प्रयत्नशील होते. प्रत्यक्षात लष्करी पथकाकडे ही जबाबदारी होती.या पथकाने अतीव मेहनतीने आपल्या कौशल्याच्या बळावर त्या मुलांची सुटका केली.त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता आणि शिस्त वाखाणण्यासारखी होती. त्या ठिकाणी बचावकार्यातव्यत्यय नको म्हणून पंतप्रधानांनी भेट टाळली. सरकारनियुक्त एकच प्रवक्ता वेळोवेळीमाहिती देत होता. महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या पालकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखूनसंयम दाखवला, धैर्य दाखवले. मुलांपर्यंत प्राणवायू,अन्न व औषधे पुरविण्यात लष्कराने दाखवलेले कसब त्यांना दिसतहोते. केवळ योग्य नियोजनामुळे आणि गोंधळ टाळून ही मोहीम फत्ते झाली आहे. यामध्येप्रसाद कुलकर्णी या किर्लोस्कर कंपनीच्या अभियंत्याचे योगदानही उल्लेखनीय आहे,यात शंका नाही. थायलंडच्या लष्करी पथकाचे खास अभिनंदन करताना,भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी वेळोवेळी आपले कसब दाखवूनअसंख्य नागरिकांचे प्राण नैसर्गिक आपत्तीत कसे वाचविले याचे कृतज्ञतापूर्वक स्मरणकरावेच लागेल. एखादी घटना जगातील नागरिकांची मने कशी हेलावून टाकतात याचे उदाहरणम्हणून थायलंडच्या घटनेकडे पाहावे लागेल. मृत्यूला हुलकावणी देत अखेर मुले वाचली,ही घटनाच विलक्षण आणि आश्चर्यकारक मानावी लागेल. प्रतिकूलतेवरमात करीत मानवी बुद्धीची झेप आणि जिद्द काय घडवू शकते याचे उदाहरण जगासमोर आलेआहे.

Related news

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार

विद्यार्थ्यांना निवासी शिबिरात सहभागी करून त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागाचा परिचय करून देण्याबरोबर श्रमसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजना परिणामकारक ठरलेली आहे. Read more

निवडणुकांच्या वातावरणात

मोठ्या राज्यात सत्ता नसल्यामुळे काँग्रेसकडे हरण्यासारखे काही नाही. उलट एखादे किंवा दोन राज्ये हातची गेली तर वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणण्याची विरोधकांना संधी मिळेल. Read more

सावध एेका पुढच्या हाका

तोंडचे पाणी पळू नये यासाठी सावध होऊन पुढच्या हाका एेकाव्या लागतील. संभाव्य पाणी टंचाई रोखायची असेल तर म्हादईचा लढा जिंकावा लागेल. Read more

Top News

खाणप्रश्नी मगोचा निर्वाणीचा इशारा

येत्या १५ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्या, अन्यथा सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार Read more

लेखाधिकारीपदांसाठी आता फेरपरीक्षेचा प्रस्ताव

लेखा खात्याला सरकारच्या मान्यतेची प्रतिक्षा Read more

मांद्रे पोटनिवडणुकीत ‘दयानंद’ केंद्रस्थानी

‘दयानंद’ बांदोडकरांनंतर ‘दयानंद’ सोपटे यांच्यामुळे पोटनिवडणूक Read more

खाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

अवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more

‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत

राज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more