दारूमुक्तीसाठी लोकलढा !

कायदेशीर परवाने असले तरी लोकांच्या वाढत्या दबावामुळे बार बंद करावे लागतील. ज्यावेळी स्थानिक लोकच एकत्रितपणे असा आदर्श जनतेसमोर ठेवतील त्यावेळी मद्यपानाचे प्रमाण कमी होऊ शकेल.

Story: अग्रलेख | 11th July 2018, 06:03 Hrs

गोवा-कर्नाटक सीमेवरील सुर्ल गावाने राज्यातील मद्यपी आणिमद्यविक्रेते यांच्या हृदयात धडकी भरावी अशी चळवळ सुरू केलीआहे. गावात एकही मद्यविक्रीचे दुकान (बार) नको अशी स्पष्ट भूमिका घेत गावातील सारेलोक अतिशय आक्रमक बनले आहेत. त्यांच्या या पवित्र्याने गावातील मद्यविक्रेते हादरलेआहेत,कारण गावातील प्रक्षुब्ध वातावरण पाहाता, त्यांना लवकरच गाशा गुंडाळावा लागणार अशी शक्यता दिसत आहे. सुर्लगावातील ही अस्वस्थता अचानक निर्माण झालेली नाही. गावात बार्रांची संख्या वाढलीआहे, त्यामुळे सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने गावातीललोक व्यसनाधीन होत आहेत, हे एकमेव कारण यामागे नाही.गावातील रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत हे कारण तर आहेच, शिवाय खास मद्यपानासाठी बाजूच्या कर्नाटकमधून तसेच गोव्यातूनही शेकडो पर्यटकसुर्लात येऊन धिंगाणा घालतात! पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते, कारण सुर्लसारख्या निसर्गरम्य गावात डोंगरमाथ्यावरून वाहाणारे छोटेधबधबे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. यानिमित्ताने गावात येणारे पर्यटक ही स्थानिकांनाडोकेदुखी ठरली आहे, कारण हे पर्यटक गावातील मद्यालयांतअमर्याद दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत गावातील मुली आणि महिलांची छेड काढतात! केवळ महसुलाच्याआशेसाठी, आर्थिक लाभासाठी समाजजीवन असुरक्षित बनावे का?स्थानिकांनी जर इंगा दाखवायचा ठरवला तर कायदा हातात घेतल्याचाठपका ठेवला जाईल. त्यामुळे सुर्लवासीयांनी सदनशीर मार्गाने आपला लढा पुढे न्यायचा ठरविलेलेदिसते. मुळावरच घाव घालणे हा एकमेव उपाय असल्याचे सुर्लवासीयांचे मत बनले आहे.जेथून दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध होते, तेच स्रोत बंदकरायचा चंग लोकांनी बांधला आहे.
सुर्लतील महिला आणि पुरूष यांनी गाव दारुमुक्त करण्याची जी चळवळ सुरूकेली आहे, त्याचे सुपरिणाम लवकरच दिसू लागतील. कायदेशीरपरवाने असले तरी लोकांच्या वाढत्या दबावामुळे बार बंद करावे लागतील. ज्यावेळीस्थानिक लोकच एकत्रितपणे असा आदर्श जनतेसमोर ठेवतील त्यावेळी मद्यपानाचे प्रमाणकमी होऊ शकेल. सुर्लातील लोकांची जिद्द आणि धडाडी प्रशंसनीय आहे, यात शंका नाही. सत्तरी तालुक्यात अलीकडे मद्यपानाचे प्रमाण धोकादायकठरले आहे. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जात आहे. हे चित्रराज्यातही वेगळे नाही. सोबतीला अमली पदार्थांचा सुळसुळाट तर जीवघेणा ठरत आहे. युवापिढी अशा पद्धतीने बरबादीकडे जात असेल तर राजकारण्यांनी त्यावर तातडीने पावले उचलायलाहवीत. सत्तरीतील दोन्ही लोकप्रतिनिधी, आरोग्य मंत्री विश्वजीतराणे आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी मद्यविक्रीवर हातोडाउगारण्यासाठी आता पुढे यावे. नवे परवाने दिले जाणार नाहीत, असे सांगणारे सरकार आपला शब्द पाळू शकलेले नाही. जनतेच्या आरोग्याचा दृष्टीनेविश्वजीत राणे यांनी मद्यपानाच्या दुष्परिणामाची जाणीव करून देण्यासाठी जागृतीकार्यक्रम राबवावा. 

Related news

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार

विद्यार्थ्यांना निवासी शिबिरात सहभागी करून त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागाचा परिचय करून देण्याबरोबर श्रमसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजना परिणामकारक ठरलेली आहे. Read more

निवडणुकांच्या वातावरणात

मोठ्या राज्यात सत्ता नसल्यामुळे काँग्रेसकडे हरण्यासारखे काही नाही. उलट एखादे किंवा दोन राज्ये हातची गेली तर वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणण्याची विरोधकांना संधी मिळेल. Read more

सावध एेका पुढच्या हाका

तोंडचे पाणी पळू नये यासाठी सावध होऊन पुढच्या हाका एेकाव्या लागतील. संभाव्य पाणी टंचाई रोखायची असेल तर म्हादईचा लढा जिंकावा लागेल. Read more