वास्कोत विविध शाळा, संस्था, कार्यालयात योगाचे महत्त्व विशद


22nd June 2018, 04:35 am
वास्कोत विविध शाळा, संस्था, कार्यालयात योगाचे महत्त्व विशद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : येथे विविध विद्यालये, सरकारी कार्यालये, संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगाचे धडे देणाऱ्यांनी योगाचे महत्त्व विषद केले.
मुरगाव पालिकेमध्ये सद्गुरू योग गुरुकुल व केंद्रीय संशोधन मंडळ, संत समाज मुरगावतर्फे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष शशिकांत परब, नगरसेवक दामू कासकर, यतीन कामुर्लेकर, श्रीधर म्हार्दोळकर, नगरसेविका लविना डिसोझा, रिमा सोनुर्लेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. संत समाज मुरगावच्या सुलक्षणा कारवारकर, सावळा कवळेकर, रोहिदास बांदोडकर, राजेंद्र मयेकर, स्वाती नाईक यांनी उपस्थितांना योगसंबंधी मार्गदर्शन केले.
रवींद्र भवनने सरकारी प्राथमिक विद्यालय बायणा, आरोग्य केंद्र वास्को, भारत स्वाभिमान पतंजली योग शक्ती मुरगाव यांच्या सहकार्याने योग दिन साजरा केला. याप्रसंगी लक्ष्मण मांद्रेकर, मंगेश लाड, गणेश गोसावी, भानुदास चौधरी यांनी योगसंबंधी मार्गदर्शन केले. यामध्ये रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, वास्को आरोग्य केंद्राच्या डॉ. रश्मी खांडेपारकर, डॉ. विश्वजित देसाई यांच्यासह रवींद्र भवन, आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच सरकारी प्राथमिक विद्यालय बायणाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.      

हेही वाचा