मन स्थिर ठेवण्यासाठी योग आवश्यक : गावकर

कातायणी बाणेश्वर विद्यालयात योग दिन

22nd June 2018, 05:34 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : आरोग्य स्वास्थ्य आणि मनस्थिर ठेवण्यासाठी योग गरजेचा आहे. हे भारतीय योगविद्येने जगाला पटवून दिल्याचे उद्गार किंदळे-पणसुले येथील श्री कातायणी बाणेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर गावकर यांनी गुरुवारी जागतिक योगदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे शारिरीक शिक्षक संतोष सतरकर उपस्थित होते. सतरकर यांनी बोलताना योग हा एखाद्या धर्म नाही, ते एक शास्त्र आहे, असे सांगून विद्यार्थ्यांनी नियमितपणे अर्धातास योग करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या पटांगणावर विविध प्रकारचे योग सादर केले.

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more