नियमित योग प्राणायम काळाची गरज : पाटणेकर

डिचोलीत पतंजली, भारत स्वाभिमानतर्फे वि‌विध ठिकाणी योगदिन


22nd June 2018, 06:32 am
नियमित योग प्राणायम काळाची गरज : पाटणेकर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : योगामुळे आरोग्याबरोबरच मनही आनंदी रहाते‍. सर्व रोगांवर उपाय व रोग होऊच नयेत यासाठी नियमित योग प्राणायाम ही आजची गरज असून बदलत्या जीवनशैलीमुळे आजार वाढत आहेत त्यावर मात करण्यासाठी योगाची सवय प्रत्येकाने लावून घेताना मानवी जीवन सुखकर कारण्यावर भर द्यावा, असे आवाहन आमदार राजेश पाटणेकर जागतिक योगदिनी डिचोलीत केले.
डिचोली पतंजली केंद्र व भारत स्वाभिमानतर्फे डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख कार्यक्रम येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरुणा पाटणेकर, कमलाकांत तारी, सध्या खानोलकर, दीपक मराठे, कशाळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटणेकर यांनी शिबिरात सहभागी होऊन प्राणायाम व आसने केली. सुरुवातीला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी योग व प्राणायाम केला. ‍
दरम्यान, डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योगदिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित केला होता. योग शिक्षक संदीप पेडणेकर, आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टर्स उपस्थित होते. सिकेरी येथील गोशाळेत योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मयेतील मठात योगदिनी कालिदास कवळेकर, सखाराम पेडणेकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डिचोली तालुका बनला योगमय
जागतिक योगदिनानिमित्त गुरुवारी डिचोली तालुक्यात विविध भागांत योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. डिचोली शांतादुर्गा विद्यालय, अवर लेडी हायस्कूल, पैरा हायस्कूल, विजयानंद, महामाया, सरकारी प्राथमिक शाळा, नानोडा, कासरपाल, न्हावेली, लामगाव, बोर्डे, सुर्ला, आमोणा-कुडणे, मुळगाव, साळ, अडवलपाल तसेच इतर सर्वच पंचायत विभागातील शाळांमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. यामध्ये मुलांनी, पालकांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. या याेगदिनामुळे संपूर्ण तालुका योगमय बनला होता.             

हेही वाचा